'नशीबवान'मधील साधीसुधी गिरीजा खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर! फोटो पाहून सौंदर्याच्या प्रेमात पडाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:56 IST2025-10-14T17:46:10+5:302025-10-14T17:56:44+5:30
'नशीबवान' मधील साधीसुधी गिरीजा खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर, पाहा फोटो

अलिकडेच १५ सप्टेंबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर नशीबवान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.
अगदी अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.
या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे, अजय पूरकर, सोनाली खरे असे तगडे कलाकार आहेत.
शिवाय नशीबवानमध्ये अभिनेत्री नेहा नाईक गिरीजा नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.
कायम दुसऱ्याचा विचार करणारी, आपल्या कुटुंबासाठी झटणारी गिरीजा मालिका रसिकांना भावली आहे.
दरम्यान, मालिकेत साधीभोळी दिसणारी गिरीजा खऱ्या आयुष्यात फारच सुंदर दिसते.
नेहा नाईक सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे तिच्या आयुष्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच नेहाने इन्स्टाग्रामवर तिचे काळ्या टॉपमधील फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून नेटकरी तिला ओळखूच शकले नाहीत.