PHOTO: मुकादमांच्या रमाची सोशल मीडियावर हवा; हटके फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:12 IST2025-04-07T18:07:46+5:302025-04-07T18:12:39+5:30

शिवानी मुंढेकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय असलेली अभिनेत्री आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.

या मालिकेत शिवानी 'रमा' नावाची भूमिका साकारते आहे.

सध्या मालिकेत मुकादमांची सून म्हणजेच रमा सुखरुप घरी परतली आहे, असा सीक्वेंस दाखवण्यात आला आहे.

या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दरम्यान, 'मुरांबा' मधील मुकादमांची सून साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकरने सुंदर फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री मनमोहक अंदाज पाहून नेटकरी सुद्धा घायाळ झाले आहेत.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.