तोच चंद्रमा नभात...! गुलाबी साडीत खुललं निशाणी बोरुलेचं सौंदर्य, फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:23 IST2025-03-31T16:07:19+5:302025-03-31T16:23:06+5:30

निशाणी बोरुले हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

'मुरांबा' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

या मालिकेत तिने साकारलेलं रेवा नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

दरम्यान, निशाणी तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे देखील अनेकदा चर्चेत येते.

आपल्या हटके स्टाईलने आणि लूकने ती चाहत्यांना कायम घायाळ करते.

नुकतेच निशाणीने सोशल मीडियावर गुलाबी साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

गुलाबी रंगाच्या साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

निशाणी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.

"तु मुझे इश्क़ की कैद में रख..., आग लगे मेरी आझादी को", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय.