"माझा आवडता छंद, एकांतात बसून तुझा विचार करणं", काश्मिरच्या खोऱ्यात रमली प्रियदर्शनी, फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:25 PM2024-06-11T16:25:21+5:302024-06-11T16:34:58+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री प्रियदर्शनीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

अगदी कमी कालावधीतच पुण्याच्या या विनम्र अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.

वेगवेगळे मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून काम करत प्रियदर्शनीने चाहत्यांना आपलंस केलं.

सध्या अभिनेत्री व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

निसर्गाच्या सानिध्यात बसून प्रियदर्शनी इंदलकर स्वत:च्या सुप्तगुणांना वाव देण्याचं काम करतेय.

काश्मिरच्या श्रीनगरमध्ये प्रियदर्शनी आपल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.

त्याचे काही खास फोटो तिने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.

काळ्या रंगाचा लॉंग ड्रेस परिधान करून तिने काही फोटो क्लिक केल्याचे पाहायला मिळत आहेत.

हातात पेन तसेच वही घेत आपल्या मनातील विचार ती कागदावर उतरवत आहे.

अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.