बाईsss...! 'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंताचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट, चाहते झाले क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:20 IST2025-02-27T17:10:56+5:302025-02-27T17:20:25+5:30
अण्णा नाईकांच्या शेवंताचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट, नेटकरी घायाळ.

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका आजही लोकप्रिय आहे.
या मालिकेतून अभिनेत्री कृतिका तुळसकर प्रसिद्धीझोतात आली.
कृतिकाने या मालिकेमध्ये शेवंता हे पात्र साकारलं होतं. 'रात्रीस खेळ चाले' मधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने एक्झिट घेतल्यानंतर या मालिकेच्या तिसऱ्या भागासाठी कृतिका तुळसकरची निवड करण्यात आली.
विविध मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये कृतिकाने काम केलं आहे.
सध्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे तिची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने समुद्रकिनारी हटके फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अण्णा नाईकांच्या शेवंताच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून नेटकरी सुद्धा क्लीन बोल्ड झाले आहेत. तिच्या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.