खूबसूरती सादगी में हैं...! ग्लॅमरस माधुरी पवारचा गावरान लूक; फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:50 IST2025-02-07T17:39:44+5:302025-02-07T17:50:06+5:30
अभिनेत्री माधुरी पवारचा गावरान अंदाज, पाहा फोटो.

'देवमाणूस' तसेच 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांच्या माध्यमातून अभिनेत्री माधुरी पवार घराघरात पोहोचली.
माधुरी पवार ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
उत्तम अभिनयाबरोबरच माधुरी एक उत्कृष्ट डान्सरही आहे.
आपल्या नृत्यकौशल्याने आणि अदाकारिने ती प्रेक्षकांना घायाळ करते.
अलिकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे खास गावरान लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
खऱ्या आयुष्यात सुंदर आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या माधुरी पवारचा फोटोमधील गावरान अंदाज पाहून नेटकरी सुद्धा घायाळ झाले आहेत.
"खूबसूरती सादगी में हैं...!" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.