दिसायला कृष्णा इतकीच सुंदर!'हळद रुसली कुंकू हसलं' मधील दुष्यंतच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:42 IST2025-09-18T17:04:27+5:302025-09-18T17:42:04+5:30
'हळद रुसली कुंकू हसलं' मधील दुष्यंतच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का? फोटो पाहून कृष्णाला विसराल

छोट्या पडद्यावरील हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
या मालिकेत अभिनेता अभिषेक रहाळकरने दुष्यंत नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री समृद्धी केळकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
समृद्धीने या मालिकेमध्ये कृष्णा हे पात्र साकारलं आहे. सध्या हळद रुसली कुंकू हसलं मध्ये दुष्यंत आणि कृष्णाची लगीनघाई सुरु असल्याचा ट्रॅक दाखवण्यात येत आहे.
मालिकेत या रिल लाईफ जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये का? अभिषेक रहाळकर खऱ्या आयुष्यात विवाहित आहे.
अलिकडेच जानेवारीमध्ये अभिषेक रहाळकर लग्नबंधनात अडकला. कृतिका कुलकर्णी असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. अभिनेत्याची पत्नी कलाविश्वापासून दूर आहे.
दरम्यान, अभिषेक रहाळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतून तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.
त्याचबरोबर त्याने 'तू तेव्हा तशी' मालिकेतही काम केलं आहे.