PHOTOS : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘माया’चे किलर फोटो, पाहून चाहतेही घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:28 PM2022-08-30T13:28:36+5:302022-08-30T13:34:03+5:30

Ruchira Jadhav : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रूचिरा जाधव नेहमी तिच्या लुकमुळे चर्चेत असते. तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो असोत वा साडीतील क्षणात व्हायरल होतात.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रूचिरा जाधव नेहमी तिच्या लुकमुळे चर्चेत असते. तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो असोत वा साडीतील क्षणात व्हायरल होतात. (सर्व फोटो : रुचिरा जाधव/ इन्स्टाग्राम)

सध्या रूचिराचे साडीतील फोटो असेच तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

आकाशी रंगाची फ्लोरल साडी आणि त्यावर मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये रूचिराने एकापेक्षा एक झक्कास पोझ दिल्या आहेत.

साडीला साजेसा मेकअप आणि मोकळे केस... तिच्या साडीतील एकापेक्षा एक कातिक अदा पाहून चाहते जणू खल्लास झाले आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे रूचिरा घराघरात पोहोचली होती. या मालिकेत तिने साकारलेले मायाचे पात्र चांगलेच गाजले होते.

गुरूनाथच्या प्रेमात पडलेली माया आणि बिझनेस कौशल्य अशा दोन्ही टप्प्यात तिने साकारली ‘माझ्या नवऱ्याची बायको’तील भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

तुझ्या वाचून करमेना या मालिकेतून तिची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली होती. यात तिने नुपूर सोमन ही व्यक्तिरेखा साकारली होती.

यानंतर लव्ह लफडे, बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड, बंच आॅफ रेड रोझेस या वेबसीरिजमध्येही ती झळकली. तू मिला या म्युझिक अल्बममध्ये सुद्धा तिने काम केलं.