'लागीरं झालं जी' फेम 'जयडी'ला ओळखलंत का? बोल्ड Photos ने वेधलं लक्ष; आता होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:52 PM2024-04-22T13:52:42+5:302024-04-22T14:01:42+5:30

'जयडी' म्हणजेच पूर्वा शिंदे दिवसेंदिवस भलतीच बोल्ड होत आहे.

झी मराठीवर काही वर्षांपूर्वी आलेली 'लागीरं झालं जी' मालिका प्रचंड गाजली. मालिकेतली अज्या आणि शीतलीच्या जोडीने प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं होतं. तसंच याच मालिकेत मामी आणि जयडी हे दोन पात्रही लोकप्रिय झाले होते.

मालिकेत जयडी ही भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदेने (Purva Shinde) निभावली होती. साध्या साडीमध्ये दिसणारी पूर्वा खऱ्या आयुष्यात किती ग्लॅमरस आहे हे तिच्या सोशल मीडियावरुन अनेकदा दिसतं.

आताही पूर्वाने बोल्ड फोटो पोस्ट केलेत. गोव्यात तिने हे फोटोशूट केलंय. नेटचा ब्लाऊज स्टाईल टॉप आणि प्रिंटेड पँट तिने परिधान केली आहे. नाजूक नेकलेकसही घातला आहे.

पूर्वाने या लूकमध्ये दिलेल्या पोज किलर आहेत. 'तुझ्या नजरेआड असले तरी मनात कायम आहे' असं एक रोमँटिक कॅप्शन तिने दिलं आहे.

'कशा पोज दिल्यात आई बाबा काही बोलत नाहीत का?','मराठी अभिनेत्रींचं काय चाललंय समजत नाही बॉलिवूडला जास्तच फॉलो करत आहेत' अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

एका फोटोवर तर तिला 'मराठीतली मलायका अरोरा' अशी कमेंट मिळाली. यावर पूर्वाने 'थँक्यू ती माझी फेवरेट आहे' असं उत्तर दिलं.

पूर्वाने याआधीही ग्लॅमरस फोटोशूट केले आहेत. मात्र या फोटोंमधील तिच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी ट्रोलच जास्त केले आहे.

पूर्वा सध्या 'पारु' मालिकेत भूमिका साकारत आहे. याआधी ती लागीरं झालं जी आणि जीव तुझा गुंतला मालिकांमध्ये दिसली होती.