फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:37 IST2025-03-10T13:15:36+5:302025-03-10T13:37:41+5:30
प्रियदर्शिनीचे सुंदर Photos, पण तरी होतेय ट्रोल!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून लोकप्रिय झालेली पुण्याची अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar). प्रियाच्या कॉमेडी टायमिंगने तर सर्वांनाच खळखळून हसवलं आहे. पण सौंदर्यातही तिचा हात कोणीच धरु शकत नाही.
प्रियदर्शिनी म्हणजेच आपली 'फुलराणी' दिवसेंदिवस आणखी सुंदर दिसत आहे. नुकतेच तिने निळ्या साडीत शेअर केलेल्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलंय.
प्रियाने या लूकमध्ये कातील पोजही दिल्या आहेत. तिने घातलेला चोक नेकलेस तिच्या सुंदर लूकमध्ये आणखी भर घालत आहे.
गडद लाल रंगाचा सिंगल स्ट्रॅप डीप नेक ब्लाऊज, लाल-निळी काठा पदराची साडी यात तिने शेअर केलेले हे फोटो पाहून चाहते फिदा झालेत
काही फोटोंमध्ये प्रियाने गॉगल घालून कडक स्टाईलही मारली आहे. कोवळ्या उन्हात तिने हे फोटोशूट केलं आहे ज्यामुळे ती आणखी shine करत आहे.
प्रियदर्शिनीच्या सौंदर्याची खासियत म्हणजे तिच्या गालावरची खळी. या सुंदर लूकमध्ये तिने गोड स्माईल आणि खळी फ्लॉन्ट करत फोटो पोस्ट केले.
प्रियाच्या सौंदर्यावरुन कोणीचीच नजरही हटत नाहीए. 'जाणवे..तुला...मला' असं कॅप्शन तिने दिलं आहे. तसंच आपलं साडीप्रेम दाखवलं आहे.
मात्र काही नेटकऱ्यांकडून तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. 'चेहरा खूप सुंदर आहे...अंगप्रदर्शन नको','तू अशीच सुंदर दिसतेस, उगीच अंगप्रदर्शन कशाला?','तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती' अशा कमेंट्स युजर्सने केल्या आहेत.