शिवानीसाठी सासूबाई झाल्या फोटोग्राफर; मृणाल कुलकर्णीने काढले सुनेचे भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 05:30 PM2022-08-04T17:30:00+5:302022-08-04T17:30:00+5:30

Shivani rangole:शिवानी आणि मृणाल यांच्यात सासू-सुनेचं नातं असण्यासोबतच त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीही असल्याचं पाहायला मिळतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे.

शिवानीचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून ती अनेकदा तिच्या जीवनातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

बऱ्याचदा शिवानी, तिच्या सासूबाईंसोबत म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबतचे फोटो शेअर करत असते.

अलिकडेच या दोघी सासू-सुनेनी मिळून एक फोटोशूट केलं. या फोटोशूटमधून त्यांच्यात किती छान बॉण्डिंग आहे हे दिसून आलं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शिवानीने अलिकडेच हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये छानसं फोटोशूट केलं.

शिवानीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिचे हे फोटो तिच्या सासूबाईंनी काढले आहेत.

शिवानीसाठी तिच्या सासूबाई, मृणाल कुलकर्णी फोटोग्राफर झाल्याचं पाहायला मिळालं. शिवानीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये फोटो मृणाल यांनी काढल्याचं म्हटलं आहे.

शिवानी आणि मृणाल यांच्यात सासू-सुनेचं नातं असण्यासोबतच त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीही असल्याचं पाहायला मिळतं.