डिट्टो आईची कॉपी! 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम ऋजुता देशमुखच्या लेकीला पाहिलंत, टीव्हीवर करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 18:24 IST2026-02-02T18:14:09+5:302026-02-02T18:24:08+5:30

'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील मानिनीच्या लेकीला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर, गाजवतेय छोटा पडदा

अभिनेत्री ऋजुता देशमुख या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. टेलिव्हिजनवर गेल्या दोन दशकांपासून अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिने घर केलं आहे.

'कळत नकळत' मालिकेमुळे ऋजुता देशमुख आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. यानंतर अभिनेत्रीने जाऊ नको दूर बाबा,तू माझा सांगती तसेच आनंदी हे जग सारे यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.

सध्या अभिनेत्री 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. या मालिकेत ती मानिनी नावाची भूमिका साकारते आहे.

परंतु, तुम्हाला माहितीये का? ऋजुता देशमुखला एक मुलगी असून तिचं नाव साजिरी आहे. साजिरी आईच्या पावलावर पाऊल ठेवत कलविश्वात पदार्पण केलं आहे.

साजिरी हुबेहुब तिच्या आईसारखीच दिसते. बोलण्याची शैली, आवाज अगजी ऋजुता देशमुखसारखा आहे.

इतकंच नाहीतर साजिरी दिसायला देखील खूप सुंदर आहे.

साजिरी सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यावर तिचे काही फोटो, व्हिडीओ देखील शेअर करते.