नवरी मुलीला बोलवा...! मराठमोळ्या अभिनेत्रीचे लग्न सोहळ्यातील Solo Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:51 IST2025-01-20T14:40:49+5:302025-01-20T14:51:08+5:30

नवरी नटली गं! अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुललं

मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदेने लग्नगाठ बांधली. तर पाठोपाठ 'आई कुठे काय करते' फेम कौमुदी वालोकरनेही लग्न केलं.

२ जानेवारी रोजी कौमुदी वालोकर लग्नबंधनात अडकली. लग्नसोहळ्यातील प्रत्येक फंक्शनसाठी तिचा पेहराव खूपच आकर्षक होता. लग्नाला काहीच दिवस झालेले असताना तिने तिचे सोलो फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी ब्लाऊज, हिरवा शालू, केसांचा खोपा, गळ्यात भरजरी हार, हातात पाटल्या, नथ आणि हिरव्या बांगड्या असा तिचा लूक आहे.

कौमुदीने या लूकमध्ये सुंदर असे कँडीड फोटो काढले आहेत. 'नवरी मुलीला बोलवा...' असं मजेशीर कॅप्शनही तिने दिलं आहे.

या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. नव्या नवरीच्या लूकमध्ये कौमुदीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

कौमुदी वालोकरचा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा पार पडला होता. तिच्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे.

आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. तिचा होणारा नवरा UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो.