वहिनीसाहेबांची कोकणात भटकंती; धनश्रीने शेअर केले बीचवरचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 16:35 IST2023-12-05T16:29:02+5:302023-12-05T16:35:14+5:30

Dhanashri kadgaonkar: धनश्रीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.

वहिनीसाहेब या नावाने मराठी इंडस्ट्रीत ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री कांडगावकर.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली.

सध्या धनश्री 'तू चाल पुढं' या मालिकेत शिल्पी ही भूमिका साकारत आहे.

धनश्री सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिच्याविषय़ीचे अपडेट चाहत्यांना देत असते.

अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

धनश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कोकणात गेल्याचं दिसून येत आहे.

धनश्री कामानिमित्त कोकणात गेल्याचं सांगण्यात येत आहे.

रत्नागिरीमधील समुद्र किनाऱ्यावर धनश्रीने मस्त फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.