'जरा प्राजक्ता माळीकडे बघ'; वजन कमी केल्यामुळे भाग्यश्री लिमये ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 03:44 PM2023-05-25T15:44:46+5:302023-05-25T15:52:04+5:30

Bhagyashree limaye: अलिकडेच भाग्यश्रीने एक फोटोशूट केलं. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये.

घाडगे अँड सून या मालिकेतून भाग्यश्रीने कलाविश्वात पदार्पण केलं आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली.

उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी भाग्यश्री सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

अलिकडेच भाग्यश्रीने एक फोटोशूट केलं. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खिडकीत बसली असून तिने फोटोसाठी काही पोझ दिल्या आहेत.

भाग्यश्रीचे हे फोटो पाहून अनेकांनी तिच्या कमी वजनामुळे तिला ट्रोल केलं आहे.

या फोटोमध्ये भाग्यश्री खूप बारीक दिसत असल्यामुळे अनेकांनी तिला वजन वाढवायचा सल्ला दिला आहे.

'अगं भाग्यश्री भरपूर जेवत जा गं. सोलापूरच्या मुली एवढ्या अशक्त नसतात. जरा प्राजक्ता माळीकडे बघ', असं एका नेटकऱ्यानी म्हटलं आहे.

'आतमध्ये जा नाही तर वारा आला तर पडशील', असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, भाग्यश्रीच्या या फोटोवर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. तर काही जणांनी तिचं कौतुकही केलं आहे.

भाग्यश्रीने शेअर केलेला छानसा फोटो