'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:18 PM2022-04-27T16:18:48+5:302022-04-27T16:22:45+5:30

Ashwini Mahangade:अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत असते.

अश्विनी महांगडे हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन नाही.

उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत झळकत आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारुन अश्विनी विशेष लोकप्रिय झाली. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत असते.

अश्विनी कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अश्विनीने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे.

यावेळी तिने नऊवारी साडी नेसून एक फोटोशूट केलं आहे.

'आपल्या अडचणींना आणि संकटांना हसून सांगा...'असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

अश्विनी अनेकदा साडीमध्येच फोटोशूट करत असल्याचं पाहायला मिळतं.