मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:33 IST2025-09-24T15:25:28+5:302025-09-24T15:33:54+5:30
नवरात्रीनिमित्त अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या थीमवर फोटोशूट करत आहेत. एका मराठी अभिनेत्रीनेही बोल्ड फोटोशूट केलं आहे.

नवरात्रीनिमित्त अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या थीमवर फोटोशूट करत आहेत. एका मराठी अभिनेत्रीनेही बोल्ड फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया नाईक आहे.
अभिनयाने प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अक्षयाने निळ्या रंगाच्या साडीत हे फोटोशूट केलं आहे.
नवरात्रीनिमित्त सिनेमांमधील स्त्रीशक्तीकरण दाखवणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांचा या शूटच्या माधम्यातून ती सन्मान करत आहे.
या नव्या फोटोशूटमधून अक्षयाने न्यूड सिनेमातील यमुना या भूमिकेला ट्रिब्युट दिलं आहे.
"यमुनेचा न्यूड मधला प्रवास हा केवळ कलेसाठी पोझ देण्याबद्दल नाही. तर तो तिच्या शरीरावर, तिच्या निवडींवर आणि तिच्या सन्मानावर पुन्हा हक्क सांगण्याच्या धाडसाबद्दल आहे".
"रवी जाधव सरांच्या न्यूड सिनेमातील यमुनाने ही शिकवण दिली की धैर्य कधीच गोंगाट करत नाही. तर शांत आणि लवचिक असतं आणि त्यामुळेच अनेकदा त्याबद्दल गैरसमज होतात".
"तिची कहाणी आपल्याला ही आठवण करून देते की कधी कधी स्त्रीने घ्यायचा सर्वात धाडसी निर्णय म्हणजे जगाने समजून नाही घेतले तरीही सन्मानाने जगणं", असं कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे.
याआधी अक्षयाने क्वीनमधील कंगना रणौत आणि कहानीमधली विद्या बालन यांच्या भूमिकेचं फोटोशूट केलं होतं.
अक्षयाच्या या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा असून चाहत्यांनाही तिचं हे फोटोशूट खास आवडलं आहे.