बाथटबमध्ये श्रेयसचं हटके फोटोशूट; यशचे फोटो पाहून घायाळ झालेल्या नेहाने केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:40 IST2022-07-01T16:37:09+5:302022-07-01T16:40:10+5:30

Shreyas talpade: अलिकडेच श्रेयसने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन त्याने नुकतंच फोटोशूट केल्याचं लक्षात येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. उत्तम अभिनयाच्या जोरावर श्रेयसने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

मराठीसह हिंदी कलाविश्वातही श्रेयसने त्याचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे आज बॉलिवूडमध्येही त्याचं नाव आदराने घेतलं जातं.

सध्या श्रेयस माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश ही मुख्य भूमिका साकारत आहे.

उत्तम अभिनयशैली आणि लूकमुळे तो सध्या तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. म्हणूनच, आज त्यायचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिलतो.

श्रेयस सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर त्याचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

अलिकडेच श्रेयसने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन त्याने नुकतंच फोटोशूट केल्याचं लक्षात येत आहे.

श्रेयसने बाथटबमध्ये बसून हे फोटोशूट केलं आहे. या फोटोवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

श्रेयसच्या फोटोवर नेहाने म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनेदेखील कमेंट केली आहे.