दोन मनं, एक हसरा क्षण अन् आयुष्यभराची साथ! मेघन-अनुष्काच्या लग्नातील Unseen फोटो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:38 IST2025-11-18T17:19:47+5:302025-11-18T17:38:19+5:30

'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधव अन् अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नातील खास फोटो चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरु होती.

अखेर १९ नोव्हेंबरच्या दिवशी मेघन-अनुष्काने लग्नगाठ बांधत ते आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत.

दरम्यान, मेघन-अनुष्काच्या लग्नासाठी चाहते देखील मोठ्या प्रमाणात आतुर होते. मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.अनुष्का व मेघनच्या लग्नाच्या मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

नुकतेच सोशल मीडियावर अनुमेघच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर आले आहेत. मेघननेही हे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या दोघांनीही लग्नसोहळ्यात पारंपरिक लूक केला होता. अनुष्का गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत खूपच सुंदर दिसत होती.

तर अनुष्काने सुंदर साडी, गळ्यात सुंदर हार, हातात मॅचिंग बांगड्या, नाकात नथ असा लूक केला होता. तर, मेघनने लग्नसोहळ्यात शेरवानी घातल्याचं पाहायला मिळत आहे.

एका फोटोमध्ये मेघन आणि अनुष्काा एकमेकांच्या डोळ्यात हरवले आहेत, एकमेकांवरुन त्यांची नजर हटत नाही.

त्यांच्या रोमँटिक फोटोंवर अनेकांनी हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.