नयनपेक्षा कित्येक पटीने स्मार्ट आहे शलाकाचा रिअल लाइफ नवरा; जाणून घ्या त्याच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:00 IST2022-07-22T13:00:00+5:302022-07-22T13:00:00+5:30

Sharvari kulkarni:वैभव सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. परंतु, शर्वरी कायम त्याच्यासोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं.

या मालिकेत देशपांडे सरांच्या तीनही लेकींनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यातलंच एक नाव म्हणजे शलाका.

देशपांडे सरांची थोरली लेक म्हणजे शलाका. अत्यंत साधी, भित्रट पण तितकीच समजूतदार अशी शलाका तिच्या अभिनयामुळे लोकप्रिय झाली.

या मालिकेत शलाकाची भूमिका अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी साकारत आहे.

शर्वरी सध्या मराठी कलाविश्वात नशीब आजमावत असून ती एका प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक आहे.

शर्वरी प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांची लेक आहे. विशेष म्हणजे शर्वरीचं लग्न झालं असून लग्नानंतर तिचीही पहिलीच मालिका आहे.

शर्वरीने वैभव बोरकरसोबत लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो शर्वरीने शेअर केले आहेत.

वैभव सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. परंतु, शर्वरी कायम त्याच्यासोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसलेला वैभव खऱ्या आयुष्यात बराच हॅण्डसम असल्याचं पाहायला मिळतं.