Mahhi Vij : लय भारी! "पैसे नव्हते पण तरीही..."; अभिनेत्रीने आई-वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:50 PM2024-01-18T12:50:47+5:302024-01-18T13:37:25+5:30

Mahhi Vij : माहीच्या घराची रंगसंगती एकदम सुंदर असून कमाल इंटीरियर करण्यात आलं आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या रुम देखील अप्रतिम आहेत.

अभिनेत्री माही विज आता Vlogger बनली आहे. तिचे Jay Mahhi Vlogs नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. जिथे ती तिच्या चाहत्यांसोबत तिच्या रोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते.

अलीकडेच तिने यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चाहत्यांना तिच्या आलिशान घराची झलक दाखवली आहे. हे आलिशान घर आई-वडिलांना गिफ्ट केल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं.

माही म्हणते, "मला नेहमीच वाटायचं की मुंबईत माझं स्वतःचं हक्काचं घर असावं. मी माझ्या पालकांना घर भेट देऊ शकले पाहिजे. कारण त्यांनी माझ्या बालपणातल्या माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सुखाचा त्याग केला आहे."

"हे घर घेण्यासाठी पैसे नव्हते. घर घेण्याचं माझं बजेट नव्हतं, पण खर्च कमी करून हे घर विकत घेईन असं मला वाटलं आणि नंतर मी मग मी हे घर घेतलं."

माहीच्या घराची रंगसंगती एकदम सुंदर असून कमाल इंटीरियर करण्यात आलं आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या रुम देखील अप्रतिम आहेत.

माहीने वडिलांची रुम दाखवली. जिथे तिने रिमोटने उघडणारे पडदे लावले आहेत. अभिनेत्री सांगते की तिने तिच्या पालकांची रुम ओपन ठेवली, कारण त्यांना ओपन रुम जास्त आवडतात.

लिव्हिंग रूमसोबतच डायनिंग एरिया तयार केला आहे. जिथे कुटुंब आणि पाहुणे आरामात बसून चवदार जेवणाचा आनंद घेऊ शकतात.

माही म्हणते की, "मी मुलांच्या रुममध्ये Bunk Beds बसवले आहेत, कारण त्यांना त्यांच्या खोलीत Bunk Beds हवे होते."

"लहानपणी मलाही Bunk Beds हवे होते, पण त्यावेळी माझ्या आई-वडिलांकडे इतके पैसे नव्हते की मला असे बेड ते देऊ शकतील."

"मी नोएडाची आहे आणि जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा लोकांना वाटले की मी काही करू शकणार नाही, पण मी स्वत:ला सिद्ध केले. आज मी माझ्या पालकांसाठी घर विकत घेतले, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे."

"मला माझ्या आई-वडिलांना प्रत्येक आनंद द्यायचा आहे. आज मी जो काही आहे ते माझ्या चांगल्या कामांमुळे आहे. मला असं वाटते की कोणी आपले कितीही वाईट केलं तरी आपण कोणाचंही वाईट करू नये" असंही माहीने म्हटलं आहे.