लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:41 IST2025-09-27T16:31:56+5:302025-09-27T16:41:11+5:30
गेल्याच वर्षी रोहितने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं. आता सावत्याने त्याच्या घराची झलक दाखवली आहे.

मुंबईत घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. साताऱ्याहून मुंबईत आलेल्या आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धी मिळवलेल्या रोहित मानेने त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.
गेल्याच वर्षी रोहितने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं. आता सावत्याने त्याच्या घराची झलक दाखवली आहे.
रोहितच्या घराचा दरवाजा आणि नेमप्लेट आकर्षक पद्धतीने डिझाइन केली आहे.
त्याच्या घरात मोठा लिव्हिंग रुम आहे आणि लिव्हिंग रुमला खास गॅलरीदेखील आहे.
लिव्हिंग रुममध्ये मोठा सोफा आहे. या सोफ्याच्या मागची भिंतही आकर्षक वस्तूंनी सजविण्यात आली आहे.
लिव्हिंग रुमच्या एका कोपऱ्यात बसण्यासाठी खास कॉर्नर डेकोरेट करण्यात आलं आहे.
रोहितच्या घरचं किचनही खूप खास आहे. अगदी सिंपल लूक किचनचा ठेवला आहे.
सावत्याच्या पत्नीने बेडरुमही खास पद्धतीने डिझाइन करून घेतली आहे. बेडरुममध्ये एका भिंतीवर फोटोंचं खास कोलाज केलं आहे.
बेडरुममध्ये एका बाजूला बेड आणि दुसऱ्या बाजूला फर्निचर केल्याचं दिसत आहे.
रोहित मानेचं मुंबईतील हे घर फारच सुंदर पद्धतीने सजवलं आहे.