बिग बॉसमध्ये 'या' लेस्बियन कपलची एन्ट्री, कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघींनी एकमेकींशी केलेलं लग्न
By देवेंद्र जाधव | Updated: August 6, 2025 12:01 IST2025-08-06T11:38:49+5:302025-08-06T12:01:46+5:30
टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉसमध्ये लेस्बियन कपल सहभागी झालंय त्यांची चर्चा आहे. या दोघांनी समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं

सध्या बिग बॉसची चांगलीच चर्चा आहे. सलमान खानच्या हिंदी बिग बॉसचं १९ वं पर्व लवकरच सुरु होतंय. अशातच मल्याळम बिग बॉसमध्ये लेस्बियन कपल सहभागी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत
‘बिग बॉस मल्याळम सीझन ७’ या रिअॅलिटी शोमध्ये नुकतीच एक विशेष आणि चर्चेची जोडी सहभागी झाली आहे. ही जोडी म्हणजे अधिला आणि नुरा.
अधिला आणि नुरा हे दोघे लेस्बियन कपल असून त्यांची पहिल्यांदा ओळख सौदी अरेबियामध्ये झाली. या दोघी तेव्हा १२ वीत शिकत होत्या.
अथिला आणि नुरामध्ये मैत्री झाली आणि पुढे त्या दोघींच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघांनी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी कुटुंबाला सांगितला.
अधिला आणि नुरा यांचं प्रेम त्यांच्या कुटुंबाने मात्र स्वीकारलं नाही. म्हणून दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना जबरदस्तीने वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. याविरोधात अथिला आणि नुराने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.
दोघींनी मिळून केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांचं प्रेम मान्य करत त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली.
अथिला आणि नुरा या दोघी आता LGBTQ+ समुदायाच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक बनल्या. आता बिग बॉस मल्याळम ७ मध्ये या दोघी कसा खेळ करणार याची सर्वांना उत्सुकता आहे