'लग्नाची बेडी' फेम मराठी अभिनेत्री पतीसोबत 'या' ठिकाणी हनिमूनला, रोमँटिक फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:33 IST2026-04-01T13:07:26+5:302026-04-01T13:33:06+5:30
काहीच दिवसांपूर्वी लग्न झालेली ही मराठी अभिनेत्री आता पतीसोबत हनिमूनला गेली आहे. अभिनेत्रीचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत.

काहीच दिवसांपूर्वी लग्न झालेली ही अभिनेत्री आता पतीसोबत हनिमूनला गेली आहे. अभिनेत्रीचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत.

ही अभिनेत्री म्हणजे रेवती लेले. स्वामिनी, लग्नाची बेडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्य रेवती लेलेने २० फेब्रुवारीला एकमेकांशी लग्न केलं.

लग्नानंतर रेवतीने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. रेवती एका खास ठिकाणी हनिमूनला गेली आहे.

रेवती तिचा पती कौशिक भिडेसोबत व्हिएतनामला गेली आहे. व्हिएतनामला जाऊन रेवतीने पतीसोबत खास पोज देऊन फोटोशूट केलं आहे.

रेवतीने सोलो फोटोशूट सुद्धा केलं असून तिचा पती कौशिक भिडेने पत्नीचे हे सुंदर फोटो काढले आहेत. दोघांमधली खास रोमँटिक केमिस्ट्री खुलून आलेली दिसतेय

रेवती आणि कौशिकच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रेवतीने शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत पतीसोबत ही खास ट्रीप केली

२० फेब्रुवारीला रेवती आणि कौशिक भिडे लग्नबंधनात अडकले. अभिनेत्री रेवती लेले आणि कौशिक भिडे यांचं पुण्यात मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. काही महिन्यांपूर्वीच रेवती लेलेने सोशल मीडियावर होणाऱ्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत तिच्या नात्याची कबुली दिली होती

















