Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 17:27 IST2024-06-09T17:06:16+5:302024-06-09T17:27:38+5:30
Srishti Jain : सृष्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलच्या दिवसांबाबत सांगितलं आहे.

'दुर्गा' आणि 'कुमकुम भाग्य' या मालिकांमुळे सृष्टी जैन घराघरात लोकप्रिय झाली आहे. सृष्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलच्या दिवसांबाबत सांगितलं आहे.
सृष्टीने सांगितलं की, जेव्हा तिने अभिनयाला सुरुवात केली तेव्हा ती वयाने खूप लहान होती. 'सुहानी' असं या मालिकेचं नाव होतं. त्यावेळी तिला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या.
"मला लाइटिंग आणि कॅमेरा याविषयी माहिती नव्हती. डीओपीने मला पाहिलं तेव्हा त्यांनी तुम्ही कोणाला उचलून घेऊन आला आहात? असा प्रश्न विचारला."
"मला खूप वाईट वाटलं. त्यांच्या बोलण्याने मी खूप दुखावले गेले. मी ढसाढसा रडले. मी अनेक तास फक्त रडतच राहिली. मी एकटी होती. पण नंतर मी स्वतःला कसं तरी सांभाळलं आणि बाहेर जाऊन शूट केलं."
"मी थिएटरसाठी काम केलं आहे. मला अभिनय येतो, पण टीव्हीवर अभिनय करणं आणि थिएटर करणं या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत."
"थिएटरमध्ये, आम्ही कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करत नाही. तिथे आपले लोक आहेत, पण कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करणे ही वेगळी गोष्ट आहे."
"त्या दिवसापासून मी अभिनय क्षेत्रात माझं करिअर करण्याचा आणि डीओपीला दाखवून देण्याचं ठरवलं होतं की माझ्याकडेही काहीतरी आहे. तेव्हापासून सर्व काही ठीक चालले आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं.