कुमकुम भाग्य फेम शिखा सिंग लवकरच देणार गुड न्यूज, फोटो शेअर करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:00 IST2020-04-23T18:00:21+5:302020-04-23T18:00:21+5:30

अभिनेत्री शिखा सिंग आणि तिचा नवरा करण शाह प्रेग्नेंसीला घेऊन खूप एक्सायटेड आहे.

कुमकुम भाग्य फेम शिखा सिंग सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे.

शिखाने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचे बेबी बंप दिसत आहे.

शिखा सिंग पहिल्यांदा आई होणार आहे. त्यामुळे ती खूप खूश आहे.

करण शाहनेदेखील ही खुशखबरी इंस्टाग्रामवर आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर केली आहे.

यासोबतच शिखा सिंगचा नवरा करण शाहनेदेखील मजेशीर पोस्ट लिहिली आहे.

शिखा व करण यांच्या फोटोत कुत्रादेखील दिसतो आहे. करणने मस्करीत लिहिले की, आमचा डॉग खूश नाही कारण त्याच्या कुटुंबात नवीन सदस्य येणार आहे.