Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:52 IST2025-08-25T17:45:50+5:302025-08-25T17:52:46+5:30
Farrhana Bhatt : बिग बॉसच्या प्रीमियर नाईटमध्ये फरहानाने तिचं संघर्षमय जीवन लोकांसोबत शेअर केलं.

काश्मीरी अभिनेत्री, ग्लोबल यूथ लीडर आणि पीस एक्टिविस्ट फरहाना भट्टने बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री केली आहे. २७ वर्षीय फरहानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
बिग बॉसच्या प्रीमियर नाईटमध्ये फरहानाने तिचं संघर्षमय जीवन लोकांसोबत शेअर केलं. तिने लहानपणापासूनच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कसा संघर्ष केला हे सांगितलं.
फरहानाने तिच्या इंट्रो व्हिडिओमध्ये सांगितलं की, ती ४ महिन्यांची असताना तिच्या वडिलांनी तिला सोडून दिलं. वडिलांच्या या निर्णयाने लेकीचं बालपण हिरावून घेतलं.
संपूर्ण आयुष्य बदललं होतं. आठवीत असताना तिने कुटुंबाचा खर्च उचलण्यासाठी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. पण यामुळे काही जवळच्या नातेवाईकांना त्रास झाला.
फरहानाला अनेक व्लॉगमध्ये धमक्या देण्यात आल्या. तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. पण फरहानाने कधीही तिचा मार्ग बदलला नाही.
अभिनेत्री लैला मजनू या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला. तिला प्रसिद्धी मिळू लागली.
असं असूनही फरहानाचा समाजाकडून अपमान झाला. तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्यात आली. तिला बहिष्काराच्या धमक्या दिल्या.
हे सर्व असूनही, फरहाना थांबली नाही. आता ती बिग बॉसमध्ये येऊन न घाबरता तिचे मुद्दे मांडेल. तिला स्वतःला शोची विजेती होताना पाहायचं आहे.
अनेक म्युझिक व्हिडिओंव्यतिरिक्त फरहानाने कंट्री ऑफ ब्लाइड, द फ्रीलान्सर, हेवन ऑफ हिंदुस्तान या वेब शोमध्ये काम केले आहे.
अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. तिने मार्शल आर्ट्समध्ये ५ वेळा राष्ट्रीय पदक जिंकलं आहे.