टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या करिश्मा तन्नाचं फोटोशूट चर्चेत, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:50 PM2022-09-23T13:50:01+5:302022-09-23T13:50:01+5:30

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास केलेल्या करिश्मा तन्ना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्मा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये करिश्माने प्लाझो पँट आणि क्रॉप टॉपसह लॉंग श्रग घातला आहे, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माची वेब सीरिज 'हुश हुश' 22 सप्टेंबर रोजी Amazon Prime वर स्ट्रीम झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

या वेब सीरिजमध्ये करिश्मा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून, जुही चावला, सोहा अली खान, कृतिका कामरा आणि शहाना गोस्वामी यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्मा 'संजू' आणि 'सूरज पे मंगल भारी' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही शोमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)