घटस्फोट झाला म्हणून काय बाईने जीव द्यावा का?, ट्रोर्लसवर भडकली अभिनेत्री काम्या पंजाबी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 02:01 PM2021-12-10T14:01:59+5:302021-12-10T14:12:18+5:30

काम्या पंजाबी (Kamya Punjabi) पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.(Photo Instagram)

अलीकडेच एका ट्रोलने काम्याच्या पहिल्या लग्नावर आणि घटस्फोटावर कमेंट केली होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करून तिचे उत्तर चाहत्यांसोबत शेअर केले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात काम्या पंजाबीने शलभ दांगसोबत लग्न केले होते. पहिले लग्न आणि घटस्फोटानंतर काम्याने पुन्हा लग्न केलं. (Photo Instagram)

काम्या पंजाबीने महिला सक्षमीकरणावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या पोस्टवर एका यूजरने कमेंट केली आहे की, "स्वत:चं लग्न तर वाचवू शकली नाही, घटस्फोट झाला, मग दुसरे लग्न,.यावर काम्याने उत्तर दिले आणि लिहिले, "मग? मला आनंदी राहण्याचा किंवा जगण्याचा अधिकार नाही? घटस्फोट झाला तर बाईने जीव द्यावा का? घटस्फोटाने महिलेचे आयुष्य संपते? जे तुमच्यासारखे विचार करतात त्यांच्या विरोधात. प्रत्येक मुलीला लढावं लागले. .मला कमजोर नको समजू, मी एक मुलगी आहे आणि मी लढू शकते.(Photo Instagram)

2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. (Photo Instagram)

तिला 9 वर्षाची एक मुलगी आहे. शलभचेही हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे.(Photo Instagram)

काम्या पंजाबीने 2001 साली अ‍ॅक्टिंग करिअरची डेब्यू केली होती.(Photo Instagram)

दोन दशकांच्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये तिने कहता है दिल, क्यूं होता है प्यार, पिया का घर, अस्तित्व - एक प्रेम कहानी, वो रहने वाली महलों की, बनूं मैं तेरी दुल्हन अशा अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

बिग बॉस सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अन्य काही रिअ‍ॅलिटी शोदेखील तिने केलेत.(Photo Instagram)

Read in English