सिल्व्हर लेहंग्यामध्ये जन्नत जुबैरने केलं ग्लॅमरस फोटोशूट; स्मित हास्याने जिंकली अनेकांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:45 IST2022-02-07T19:42:25+5:302022-02-07T19:45:42+5:30

Jannat zubair: जन्नतने 'फुलवा', 'तू आशिकी', 'काशी' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

टिकटॉक स्टार ते सेलिब्रिटी असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबैर. आजवर जन्नत अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे.

कलाविश्वाप्रमाणेच जन्नत सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असते. अलिकडेच तिचे इन्स्टाग्रामवर ४ कोटी फॉलोअर्स झाले आहेत.

जन्नत अनेकदा इन्स्टावर तिचे बोल्ड, ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

जन्नतने नुकतंच एक सिल्व्हर रंगाच्या लेहंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिने तिच्या स्मित हास्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.

जन्नतने 'दिल मिल गये' या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तमन्ना असं तिच्या भूमिकेचं नाव होतं.

जन्नतने 'फुलवा', 'तू आशिकी', 'काशी' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.