'जय मल्हार'फेम सुरभी हांडेच्या रिअल लाइफ खंडेरायांना पाहिलंय का कधी? जाणून घ्या तिच्या नवऱ्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:00 IST2022-02-25T15:00:00+5:302022-02-25T15:00:00+5:30

Surbhi hande:सुरभी आणि दुर्गेश एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

जय मल्हार या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी हांडे.

जय मल्हार या मालिकेत सुरभीने म्हाळसा देवी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेमुळे ती विशेष लोकप्रिय झाली.

सध्या सुरभीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम सक्रीय असते.

सुरभी अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोसोबतच तिच्या कुटुंबासोबतचेही फोटो शेअर करत असते.

अनेकदा सुरभीच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

सुरभीच्या नवऱ्याचं नाव दुर्गेश कुलकर्णा आहे. २०१९ मध्ये सुरभी आणि दुर्गेशने लग्नगाठ बांधली.

पुण्यातील मुळशी येथील ढेपेवाडा येथे सुरभी-दुर्गेशने लग्न केलं.

सुरभी आणि दुर्गेश एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

जय मल्हार, लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकांमध्ये झळकली आहे. तसंच अग्गं बाई अरेच्चा 2 या चित्रपटातही तिने छोटेखानी भूमिका साकारली आहे.