Photos: 'जय मल्हार'मधील म्हाळसाच्या घरी गौराईचं आगमन, सुरभी हांडेने दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:33 IST2025-09-02T14:53:03+5:302025-09-02T15:33:39+5:30
म्हाळसा आता कशी दिसते? पाहा लाडक्या अभिनेत्रीचे सुंदर Photos

दहा वर्षांपूर्वी आलेली 'जय मल्हार' मालिका तुफान गाजली होती. देवदत्त नागेने खंडोबाची भूमिका साकारली होती. तर ईशा केसकर (बानू) आणि सुरभी हांडे(म्हाळसा) या दोन अभिनेत्री या मालिकेमुळे भेटीस आल्या.
या तिन्ही कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं होतं. आज देवदत्त नागे मालिका, सिनेमांमध्ये दिसतो. तर ईशाही सध्या 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत दिसत आहे.
मात्र म्हाळसा म्हणजेच अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi Handay)'जय मल्हार' नंतर फारशी प्रसिद्धीझोतात आली नाही. मालिकेवेळी तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तसंत तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं.
सुरभी हांडे भंडारा येथील आहे. तर तिचं शिक्षण जळगावात झालं. सुरभीने भंडारा येथील घरी महालक्ष्मीचं आगमन झाल्याची पोस्ट केली आहे. यासोबत तिने सुंदर फोटो शेअर केले आहेत.
सुरभीच्या भंडारा येथील घरी उभ्या महालक्ष्मी बसल्या आहेत. तिने याची झलक दाखवली आहे. कुटुंबासोबत मिळून तिने मनोभावे गौरी गणपती सण साजरा केला.
तसंच सुरभी आजही दिसायला तितकीच सुंदर आहे. हिरव्या रंगाचे काठ असलेल्या लाल साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. 'म्हाळसा देवी तुम्ही खूप सुंदर दिसता' अशा कमेंट तिच्या पोस्टवर आल्या आहेत.
सुरभी हांडे काही महिन्यांपूर्वी 'गाववाटा' या डॉक्युमेंटरीमध्ये दिसली होती. गेल्या वर्षी ती 'आई तुळजाभवानी' मालिकेत झळकली. यातही तिने म्हाळसा देवीचीच भूमिका साकारली. अनेक वर्षांनंतर तिने टीव्हीवर कमबॅक केलं होतं. नंतर ती 'अगं बाई अरेच्चा २','छत्रपती ताराराणी' या सिनेमांमध्येही दिसली.
६ वर्षांपूर्वी सुरभी दुर्गेश कुलकर्णीसोबत लग्नबंधनात अडकली. नवऱ्यासोबतही अनेकदा सुरभीने फोटो पोस्ट केले आहेत.