अभिनयच नाही तर व्यवसायातही अजमावतायत नशीब; 'या' टीव्ही अभिनेत्रींनी निवडल्या वेगळ्या वाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:58 IST2024-09-19T16:38:05+5:302024-09-19T16:58:25+5:30
हिंदी मालिका विश्वातील या अभिनेत्री अभिनयासह व्यवसायातूनही बक्कळ कमाई करतात.

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपलंस करणाऱ्या या नायिका यशस्वीरित्या व्यवसायातही त्यांचं नशीब अजमावत आहेत. चला तर मग जाणून घेऊया...
सरगुन मेहता-
टीव्ही अॅक्ट्रेस सरगुन मेहता व्यवसायतून चांगले पैसे कमावते. सरगुन आणि तिचा नवरा रवि दुबे यांचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. 'नामा ड्रीमियाटा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड' असं त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे.
मौनी रॉय-
मौनी रॉय या अभिनेत्रीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सध्याच्या घडीला मौनी एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. तिने गेल्या वर्षीच मुंबईत 'बदमाश' नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं.
रुपाली गांगुली-
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या वडिलांसोबत एक अॅड एजेंसी चालवते.
अदिती शिरवाइकर-
अभिनेत्रीचं मुंबई आणि बंगळूरु येथे स्वत: च्या मालकिचं रेस्टॉरंट आहे. त्यातून ती चांगली कमाई करते.
सिंपल कौल-
'तारक मेहता फेम' अभिनेत्री सिंपल कौल एक रेस्टॉरंट चालवते. ज्याच्या माध्यमातून तिला चांगलं उत्पन्न मिळतं.
आशका गोराडिया-
अभिनय क्षेत्राला रामराम केल्यानंतर आशका गोराडियाने २०१९ मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू केला. अभिनेत्री कॉस्मेटिक्स आणि स्किनकेअर ब्रॅंड 'रेनी कॉस्मेटिक्स' च्या विक्रीतून बक्कळ कमाई करते.
रक्षंदा खान-
रक्षंदा खान एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांभाळते. त्यासोबतच तिचं स्वत:च्या मालकिचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे.