'या' अभिनेत्रीनं धर्मासाठी तोडलं होतं बॉयफ्रेंडसोबत नातं, ब्रेकअपनंतर आता असं जगतेय आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:58 IST2025-05-22T17:46:48+5:302025-05-22T17:58:13+5:30

अनेक सेलिब्रिटींनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन, धर्माचं बंधन झुगारून आपला जोडीदार निवडल्याचं आपण वाचलं आहे. पण आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिनं केवळ धर्म वेगळा असल्यामुळे आपल्या प्रेमाला सोडण्याचा निर्णय घेतला.

ही अभिनेत्री म्हणजे 'बिग बॉस 13' फेम हिमांशी खुराना (Himanshi Khurana).

हिमांशी अनेक पंजाबी म्युझिक अल्बम्समध्ये आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. पण, 'बिग बॉस १३'मुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली होती.

'बिग बॉस'च्या घरामध्ये ती मॉडेल आणि अभिनेता आसिम रियाजच्या प्रेमात पडली होती.

हिमांशी आणि आसिमचं नातं 'बिग बॉस' संपल्यानंतरही काही वर्षं टिकून होतं. दोघंही अनेकदा एकत्र दिसायचे. पण अचानकच दोघांनी सोशल मीडियावरून ब्रेकअपची घोषणा केली होती.

हिमांशी खुरानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहिलं होतं की, "होय, असीम आणि मी आता एकत्र नाही. आम्ही एकत्र घालवलेले काही क्षण खूप खास आणि सुंदर आहेत. पण आमची सहवास आता इथेच संपला आहे. आमच्या नात्याचा प्रवास खूप छान होता, पण आता आम्ही आपापल्या जीवनात पुढे जात आहोत. आपापल्या धर्माचा आदर करताना, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धांसाठी आम्ही प्रेमाचा त्याग करत आहोत. आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही. आम्ही तुम्हाला आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो".

या निर्णयामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं होतं. सध्या हिमांशी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. ब्रेकअपनंतर तिनं स्वतःचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.