'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या फॅमिलीचे फोटो पाहिलेत का?, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 18:48 IST2020-03-03T18:44:53+5:302020-03-03T18:48:50+5:30

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
अपूर्वाची आई सुप्रिया नेमळेकर
अपूर्वाचा भाऊ ओमकार नेमळेकर
२७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.
अपूर्वाने इव्हेंट मॅनेजरमेंट कंपनीद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यापूर्वीच अभिनयातही एन्ट्री केली होती.
आभास हा या मालिकेची ऑफर स्वीकारल्यानंतर एकीकडे स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि दुसरीकडे अभिनय अशी तिची कसरत सुरु होती. पुढे तिने स्वत:चा इमिटेशन ज्वेलरी डिझाईनिंगचा ब्रँडही काढला.