Spruha Joshi :स्पृहा जोशीच्या पतीला पाहिलंत?, पत्नी अभिनेत्री असूनही लाईमलाईटपासून राहतो कोसोदूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:00 AM2023-01-20T07:00:00+5:302023-01-20T08:57:01+5:30

स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती अनेकदा पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

स्पृहा जोशी मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री. अभिनयासोबतच ती उत्तम कवयित्री देखील आहे.. (Photo Instagram)

आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.(Photo Instagram)

अग्निहोत्र, आभाळमाया, उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, एक हा असा धागा सुखाचा, दे धमाल, बॉम्बे लायर्स, सत्यमेव जयते, सुपस्टार, सुर नवा ध्यास नवा यासारख्या मालिका व शोमध्ये देखील ती झळकली आहे.(Photo Instagram)

स्पृहा तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत तिने लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. (Photo Instagram)

स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती अनेकदा पती वरद लघाटेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.. (Photo Instagram)

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि वरद लघाटे यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.(Photo Instagram)

२००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. (Photo Instagram)

वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. (Photo Instagram)

पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे.(Photo Instagram)