हेच तर असतं सुख... काश्मीरमध्ये फिरतेय गिरीजा प्रभू, पाहा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:08 IST2025-03-12T15:31:04+5:302025-03-12T16:08:20+5:30

अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) सध्या काश्मीरमध्ये फिरतेय.
गिरीजाने सोशल मीडियावर काश्मीर टूरचे (Girija Prabhu in Kashmir) फोटो पोस्ट केले आहेत.
तिने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये काश्मीरमधील जादुई नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतंय.
गिरीजाने काश्मीरच्या बर्फात सुंदर फोटो काढले आहेत.
या फोटोमध्ये गिरीजा ही बर्फवृष्टीचा मनसोक्तपणे आनंद घेताना दिसतेय.
तिचे निसर्गाच्या सानिध्यात काढलेले हे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.
गिरीजा अलिकडेच स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय.
गिरीजा ही नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते.
अभिनेत्रीला फिरण्याचीही फार आवड आहे. ती कायम वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असते.
आता चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.