गौतमी पाटीलनं 'अशी' साजरी केली दिवाळी, नृत्यासोबतच रांगोळी काढण्यातही ती परफेक्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:32 IST2025-10-24T18:22:10+5:302025-10-24T18:32:53+5:30
दिवाळीनिमित्त गौतमी पाटीलने शेअर केलेल्या फोटोंमधून तिच्या घराची झलक दिसली.

लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील सध्या महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गौतमीने यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली.

गौतमीने सेलिब्रेशनचे काही खास फोटो तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

गौतमी पाटीलने दिवाळीनिमित्त केलेला खास लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

गौतमीने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. या साध्या पण आकर्षक ड्रेसमध्ये ती खूपच मोहक दिसत होती.

गौतमीने हातात दिवे घेऊन फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

गौतमीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या घराच्या आतील आणि बाहेरील सजावटीची एक झलक पाहायला मिळत आहे. पारंपरिक दिव्यांच्या रोषणाईने तिचे घर अधिकच सुंदर दिसत आहे.

गौतमीने दिवाळीनिमित्त सुंदर रांगोळी काढली.

नृत्यासोबतच रांगोळी काढण्यातही गौतमी पाटीलचा हातखंडा आहे, हे तिच्या चाहत्यांना या फोटोंमधून पाहायला मिळालं.

गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी 'महाराष्ट्राची लावणी क्वीन' गौतमीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

गौतमी पाटीलचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना उत्सुकता असते. गौतमी देखील सोशल मीडियावर तिचे वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टी शेअर करत त्यांच्या संपर्कात राहते.

अलिकडेच गौतमीने 'प्रेमाची गोष्ट' या सिनेमातील 'दिसला गं बाई दिसला' या गाण्यात धमाकेदार डान्स केला. नेहमीप्रमाणेच गौतमीची ऊर्जा आणि तिच्या नृत्यातील अदाकारी या गाण्यातही पाहायला मिळाली आहे.

















