'कॉमेडी सर्कस'मधील 'गंगूबाई' आता दिसते खूप ग्लॅमरस, फोटो बघून तुम्ही ओळखूच शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:35 IST2025-11-17T15:00:31+5:302025-11-17T15:35:10+5:30

कॉमेडी सर्कसमध्ये झळकलेली गंगूबाई फेम बालकलाकार आता मोठी झाली आहे. तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत

टीव्ही वरील लोकप्रिय शो म्हणजे 'कॉमेडी सर्कस'. या शोमध्ये काही वर्षांपूर्वी एका छोट्या मुलीने चांगलीच लोकप्रियता मिळाली. 'गंगूबाई'च्या भूमिकेत या छोट्या मुलीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं

गंगूबाईची भूमिका अभिनेत्री सलोनी दैनीने साकारली. सलोनी आता मोठी झाली असून तिचे फोटो पाहून तुम्ही तिला ओळखूच शकणार नाही. सलोनी आता २४ वर्षांची झाली आहे.

बालपणी टीव्हीवर लोकप्रियता मिळवलेल्या सलोनीने नंतर मात्र स्वतःमघ्ये जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करुन सर्वांना थक्क करुन सोडलं. त्यामुळे सलोनीला आता ओळखू येणंच कठीण झालंय.

सलोनी दैनीने वयाच्या तीसऱ्या वर्षापासून कॅमेरासमोर आत्मविश्वासाने काम करायला सुरुवात केली. आजही तिने साकारलेली 'गंगूबाई' चाहत्यांच्या मनात आहे

सलोनीने प्रचंड मेहन करुन स्वतःचं २२ किलो वजन कमी झालं. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने ती एकदम फिट अँड फाईन झाली.

'कॉमेडी सर्कस'नंतर सलोनीने २०२५ साली टीव्हीवर प्रसारित झालेल्या 'जादू ये जिन्न का' या मालिकेत अभिनय केला. सलोनीच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.

सलोनीला नंतर बॉलिवूड सिनेमात काम करायची ऑफर मिळाली. करीना कपूरच्या 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमात सलोनी झळकली.