शिवानी सुर्वे इतकीच सुंदर दिसते तिची बहीण; दोघींमधील साम्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:28 AM2022-02-17T10:28:26+5:302022-02-17T10:32:37+5:30

Shivani surve: सध्या सोशल मीडियावर शिवानीसह तिच्या बहिणीचा फोटोही व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. उत्तम अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळे शिवानीने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे.

देवयानी, बिग बॉस मराठी अशा अनेक मालिका, रिअॅलिटी शोमधून शिवानी घराघरात पोहोचली आहे.

त्यामुळे आज तिचा चाहतावर्गदेखील तितकाच मोठा असल्याचं पाहायला मिळतं.

शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या प्रियकरासोबतचे वा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.

सध्या सोशल मीडियावर शिवानीसह तिच्या बहिणीचा फोटोही व्हायरल होत आहे.

शिवानीला दोन सख्या बहिणी आहेत हे फार कमी जणांना माहित आहे.

शिवानीच्या बहिणीही तिच्याप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय आहे.

शिवानीच्या बहिणीचं नाव तन्वी सुर्वे आहे. तन्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

तन्वीला फोटोशूटची विशेष आवड असून ती अनेकदा नवनवीन ठिकाणांना भेट दिल्यावर तिचे फोटो शेअर करते.

तन्वीने चिपळूनमध्ये काढलेला खास फोटो