अग्गंबाई सूनबाई फेम अद्वैत दादरकरची पत्नी देखील आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा, दिसायला आहे खूपच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 07:00 IST2022-06-04T07:00:00+5:302022-06-04T07:00:06+5:30
सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. त्यांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेता अव्दैत दादरकरची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे अव्दैत दादरकर आणि त्याच्या पत्नीची आहे.
अग्गंबाई सूनबाई मालिकेत त्याने सोहमची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या निगेटिव्ह भूमिकेमुळे तो चांगला चर्चेतही आला होता.
अद्वैतने मालिकांसोबतच अनेक मराठी नाटकांमध्ये देखील काम केले आहे. त्याची पत्नी देखील त्याच्याप्रमाणेच मराठी रंगभूमीवरील एक प्रसिद्ध कलाकार आहे.
अद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या नाटकांचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली होती. (Photo Instagram)
तसेच या नाटकात तिच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत होता. या नाटकातील भक्तीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.(Photo Instagram)
भक्तीने नाटकांप्रमाणेच मालिकेत देखील काम केले आहे. झी मराठीवरील अरुंधती या प्रसिद्ध मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. (Photo Instagram)
अद्वैत आणि भक्ती दोघे एकमेकांना कॉलेज जीवनापासूनच ओळखतात. कॉलेजमध्ये असताना तो नाटकाचे दिग्दर्शन करायचा तर भक्ती नाटकात काम करायची. (Photo Instagram)
त्यामुळेच त्या दोघांचा परिचय झाला. काहीच महिन्यात त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Photo Instagram)
अद्वैत आणि भक्ती यांना एक मुलगी आहे. भक्ती सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर करत असते. तिचे नाव मीरा असून ती खूपच गोंडस आहे. (Photo Instagram)