मिसेस उपमुख्यमंत्र्यांपुढे अभिनेत्रीही फिक्या! अमृता फडणवीसांचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले "तुम्ही रिहानापेक्षा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:02 PM2024-03-08T15:02:53+5:302024-03-08T15:07:08+5:30

परी म्हणू की सुंदरा! अमृता फडणवीसांचा मॉर्डन लूक, फोटो पाहून चाहते अवाक्

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पेशाने बँकर असून गायिकाही आहेत.

अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा त्या त्यांचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसतात.

अनेक कार्यक्रमांनाही त्या उपस्थिती दर्शवतात. त्यांच्या कामाबरोबरच फॅशनमुळेही अनेकदा अमृता फडणवीस चर्चेत असतात.

अमृता फडणवीस अनेकदा त्यांचे फोटोही शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी मॉर्डन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

अमृता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन त्यांच्या हटके लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांना थक्क केलं आहे.

या फोटोमध्ये त्यांनी वन पीस परिधान करत एखाद्या मॉडेलप्रमाणे फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.

त्यांच्या या फॅशन सेन्स आणि मॉर्डन लूकपुढे भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्री फिक्या पडतील. अमृता यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

"तुम्ही रिहानापेक्षा पॉप्युलर आहात", "स्मार्ट वहिनी" अशा कमेंट त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत.