पती अन् चिमुकल्या लेकींसह श्रीलंकेहून परतली, झाली संसर्गाची शिकार; लेकींपासून राहावं लागतंय दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:35 PM2023-03-01T14:35:44+5:302023-03-01T14:50:29+5:30

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी काही महिन्यांच्या बाळांना घेऊन सुट्टीसाठी श्रीलंकेला गेली. आता संसर्ग झाल्याने लेकींपासून दूर राहत आहे.

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. देबिनाने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला आहे. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर लगेच त्याच वर्षी तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला

देबिना पती गुरमीत आणि दोन्ही मुलींसोबत श्रीलंका ट्रीपवर गेली होती. मात्र तिथून परत येताच तिला कुटुंबापासून दूर राहावं लागत आहे.

देबिनाला इन्फ्लुएंझा व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तिने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत याची माहिती दिली.

सुदैवाने तिच्या दोन्ही मुली आणि गुरमीत हे निगेटिव्ह आले आहेत. सध्या देबिना रिकव्हरी स्टेजमध्ये आहे.

इन्फ्लुएंझा बी व्हायरस पॉझिटिव्ह आले आहे. वेल, हॅंग ऑव मम्मा!माझ्या बाळांपासून दूर राहात आहे. आईपण सोपं नाही. मला ताप आणि सर्दी ही लक्षणं आहेत.

देबिनाची ही मुलींसोबत पहिली आंतरराष्ट्रीय ट्रीप होती. तिने श्रीलंका हॉलिडेचे अनेक फोटो व्हिडिओ शेअर केले होते.

६ नोव्हेंबर २०२२ रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.लग्नाच्या 11 वर्षानंतर या जोडप्याला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले आहे.

दिविशा प्री-मॅच्युअर होती म्हणून देबिना आणि गुरमीतने आपल्या बाळाला बराच काळ लाइमलाइटपासून दूर ठेवले होते.

देबिना अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे, पण तिच्या 'देबिना डीकोड्स' या यूट्यूब चॅनलद्वारे तिच्या चाहत्यांशी कनेक्ट आहे.