'दार उघड बये' फेम मुक्ता पोहोचली गोव्यामध्ये; बदललेला लूक पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:44 IST2024-04-27T15:35:06+5:302024-04-27T15:44:38+5:30

Saaniya Chaudhari: या फोटोमध्ये सानिया कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा सिंपल लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'दार उघड बये'. या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

या मालिकेत शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव, सानिया चौधरी अशी तगडी स्टारकास्ट झळकली होती.

ही मालिका संपून बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलाकार सध्या काय करतात हा प्रश्न अनेकांना पडतो.

दार उघड बये या मालिकेत अभिनेत्री सानिया चौधरी हिने मुक्ता ही मुख्य भूमिका साकारली होती.

सानिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या सानिया गोव्यात तिचं व्हेकेशन एन्जॉय करतीये. येथील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सानिया कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा सिंपल लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सानियाने मालिकेसह नाटकांमध्येही काम केलं आहे. तसंच ती उत्तम नृत्यांगनादेखील आहे.