'मेड फॉर इच अदर' कपल कुशल ब्रदिकेच्या पत्नीविषयी या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 01:33 PM2021-05-25T13:33:44+5:302021-05-25T13:50:22+5:30

कुशल बद्रिके आणि सुनैना बद्रिके सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.ते जे काही करतात त्याची आपसुकच चर्चा होते. मग ते कुठे आऊटिंग असो किंवा मग सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो. यामुळे हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरतात.

कुशल बद्रिके आणि सुनैना यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते.कुशल आणि सुनैनाची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.

कुशल कॉलेजमध्ये असताना एकपात्री स्पर्धेत भाग घेतला होता. ‘ती फुलराणी’मधला एका भागाच्या सादरीकरणावेळी एका तरुणीने कुशलचं लक्ष वेधून घेतले होती. ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून ती सुनैना होती.

काही वर्षांनी योगायोगाने सुनैनासोबत कुशलला पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली.आश्चर्याच्या बाब म्हणजे सुनैनाने कुशलच्या बायकोची भूमिका साकारली होती.

तिच्याबरोबर काम करताना तो तिच्या प्रेमात पडला होता.दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढु लागल्या. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

आश्चर्य म्हणजे सुनैनानेच कुशलला लग्नासाठी प्रपोज केले होते. कुशलनेही लगेचच होकार दिला. ​घरच्यांकडून त्यांच्या लग्नाला थोड्याफार प्रमाणात विरोधही झाला.

ोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि दोघांचं शुभमंगल पार पडलं.सुनैना खंबीरपणे कुशलच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते,त्याला पाठिंबा देते.

करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी सुनैना त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि कुशलचा विश्वास कधीही ढळू दिला नाही.

कुशलच्या आजवरच्या प्रवासात तिचा मोठा वाटा आहे. लग्नानंतर घर आणि मुलगा यांच्या जबाबदारीमुळं तिची नृत्याची आवड मागं पडली होती

सुनैना तिच्या कलेची आवड जोपासत आहे.सोशल मीडियावर ती अनेक फोटो व्हिडिओ शेअर करत असते. कुशलला देखील तिच्या या कलेचं कौतुक करत असतो.

कुशल बिझी शेड्युअलमधून वेळ काढत कायम कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण घालवत एन्जॉय करत असतो. कुशलचे सगळ्याच फोटोंना चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत असतात.