Bigg Boss 19: खूपच ग्लॅमरस दिसते वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मालती, तिच्यापुढे तानिया मित्तल काहीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:43 IST2025-10-06T11:23:47+5:302025-10-06T11:43:34+5:30
Malti Chahar Bigg Boss 19: मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मोठा धमाका झाला आहे. दुसऱ्या वाइल्ड कार्डने घरात एन्ट्री घेतली आहे.
भारतीय क्रिकेटर दिपक चहरची बहीण मालती चहर हिने 'बिग बॉस १९'च्या घरात रविवारी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली.
मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
बिग बॉसच्या घरात अमाल आणि तानियाच्या ग्रुपचा भाग होण्याची इच्छा मालतीने एन्ट्री घेण्याआधी व्यक्त केली होती.
घरात येताच मालतीने तिचा गेम खेळायला सुरुवात केली आहे. मालतीच्या येण्याने घरातील सदस्यांपैकी तानिया मित्तल सगळ्यात जास्त अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे.
मालतीची अमालशी जवळीक तानियाला खटकल्याचं दिसतंय. त्यामुळे मालती आणि तानियामध्ये येत्या काही दिवसांत कोल्ड वॉर रंगताना दिसू शकेल.
मालती ही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. ती मॉडेलिंगही करते. अनेक ब्युटी पेजेंट्स स्पर्धेत मालती सहभागीही झाली होती.
मिस इंडिया अर्थ २००९ हा खिताब तिच्या नावावर आहे. तर फेमिना मिस इंडिया २०१४ ची ती उपविजेती होती.
मालती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे १ मिलियन फॉलोवर्स आहेत. मालतीने 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेतली तर घरातील समीकरणं पुन्हा बदलताना दिसतील.