अंकिता लोखंडेचं खरं नाव माहितीये का?; इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ज्योतिषांच्या सल्ल्याने बदललं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:16 PM2023-11-07T12:16:05+5:302023-11-07T12:19:45+5:30

Ankita lokhande: अंकिताने एका ज्योतिषाच्या सांगण्यावरुन तिचं नाव बदललं आणि त्यानंतर इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.

प्रोफेशनल लाइफपेक्षा अंकिता तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर तिची सर्वाधिक चर्चा रंगली.

सध्या अंकिता बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाली आहे. या रिअॅलिटी शोमध्ये तिने पती विकी जैनसोबत एन्ट्री केली आहे.

बिग बॉसच्या घरात गेल्यापासून अंकिता तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा करत आहे.

सध्या अंकिता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत असून तिच्याविषयी नवनवीन गोष्टी चाहत्यांना कळत आहेत.

अंकिताच्या प्रोफेशनल लाइफविषयी सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं कोणाला ठावूक नाही.

सध्या अंकिताचं वैवाहिक जीवन जरी चर्चेत येत असलं तरीदेखील तिच्या स्वत:च्याविषयी नेटकऱ्यांना फारसं माहित नाही.

इंदौरमध्ये एका मराठी कुटुंबात अंकिताचा जन्म झाला आहे. ३८ वर्षाच्या अंकिताने २०२१ मध्ये विकी जैनसोबत लग्न केलं.

आज ही अभिनेत्री अंकिता लोखंडे या नावाने लोकप्रिय आहे. मात्र, तिचं खरं नाव दुसरचं आहे. जे फारसं कोणाला ठावूक नाही.

अंकिताने एका ज्योतिषाच्या सांगण्यावरुन तिचं नाव बदललं आणि त्यानंतर इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

अंकिताचं खरं नाव तनुजा लोखंडे असं आहे. मात्र, ज्योतिषांच्या सांगण्यावर तिने नाव बदललं त्यामुळे इंडस्ट्रीत आणि घरीदेखील तिला अंकिता याच नावाने बोलवतात.