PHOTOS : ‘भाभी जी घर पर है’ची नवी गोरी मॅम आहे भलतीच हॉट, कोण आहे विदिशा श्रीवास्तव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:17 IST2022-02-25T15:03:48+5:302022-02-25T15:17:35+5:30
Bhabi Ji Ghar Par Hai : ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील गोरी मॅम रिप्लेस होणार म्हटल्यावर तिची जागा कोण घेणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. तर आता त्याचा खुलासा झाला आहे. विदिशा श्रीवास्तव नवी गोरी मॅम बनणार आहे.

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील गोरी मॅम रिप्लेस होणार म्हटल्यावर तिची जागा कोण घेणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. तर आता त्याचा खुलासा झाला आहे. विदिशा श्रीवास्तव नवी गोरी मॅम बनणार आहे.
नेहा पेंडसेने गोरी मॅम अर्थात अनिता भाभीची भूमिका सोडली. तिच्या जागी आता विदिशा श्रीवास्तव ही अभिनेत्री अनिता भाभीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आता ही विदिशा श्रीवास्तव कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर आज आम्ही तिच्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
तर विदिशा ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या काशीबाई बाजीराव बल्लाल या मालिकेत ती शिवबाईची भूमिका साकारते आहे.
‘भाभी जी घर पर है’ सारख्या लोकप्रिय मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारायला मिळतेय म्हणून विदिशा प्रचंड उत्सुक आहे. हा माझ्या करिअरचा टर्निंग प्वॉइंट आहे, असं तिने म्हटलं आहे.
विदिशाला अभिनेत्री यामी गौतमची डुप्लिकेट म्हणूनही काही जण ओळखतात. ती बरीचशी यामीसारखी दिसते.
विदिशाने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगसाठी केली. मॉडेलिंग करता करता ती अॅक्टिंग क्षेत्रात आली.
तेलगू, कन्नड, मल्याळम, तामिळ अशा अनेक भाषेतील चित्रपटांत तिने काम केले आहे.
ये है मोहब्बतें, मेरी गुडिया, कहत हनुमान जय श्री राम अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलंय.
ये है मोहब्बतें या मालिकेत विदिशाने रोशनी आदित्य भल्लाची भूमिका साकारली होती.