'बालिका वधू' फेम अभिनेत्री १३ वर्षांनी करतेय कमबॅक, दोनच वर्षांपूर्वी दिला मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:33 IST2025-04-18T13:21:27+5:302025-04-18T13:33:30+5:30

लग्नानंतर १० वर्षांनी तिला मुलगी झाली. आता ती पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. कोण आहे ही?

२००८ साली आलेली 'बालिका वधू' (Balika Vadhu) मालिका खूप गाजली. अभिनेत्री अविका गौरने मालिकेत छोट्या आनंदीची भूमिका साकारली होती. तसंच मालिकेतील जगदीश, दादी सा, सुगना, गहना सारखे सर्व पात्र गाजले.

मालिकेत जगदीशच्या काकांचं लग्न त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या गहना या मुलीसोबत होतं. अभिनेत्री नेहा मर्दाने (Neha Marda) गहनाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत खूप पसंत केलं होतं.

अभिनेत्री नेहा मर्दा आता १३ वर्षांनी कामावर परतली आहे. मधल्या काळात नेहा नक्की कुठे होती आणि काय करत होती जाणून घेऊया.

नेहा बऱ्याच वर्षांपासून पडद्यावरुन गायब आहे. मात्र ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. आता तिने कमबॅकची घोषणा केली आहे.

तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती ऑडिशन देताना दिसत आहे. तसंच इतक्या वर्षांनी कॅमेऱ्यासमोर उभं राहून तिने आनंद व्यक्त केला आहे.

नेहाने २०१२ साली आयुषमान अग्रवालसोबत लग्न केलं. नंतर ती पटनाला शिफ्ट झाली. नेहा काही वेळा मुंबई तर काही वेळा पटनामध्ये असायची.

मूल होण्यासाठी नेहाने खूप प्रयत्न केले आणि लग्नानंतर १० वर्षांनी नेहाला मुलगी झाली. २०२२ साली अनायराचा जन्म झाला.

लेकीच्या जन्मानंतर नेहाच्या वजनात खूप वाढ झाली होती. डाएट आणि व्यायाम करुन आता तिने वजन नियंत्रणात आणलं आहे. नेहा आता पुढे कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.