बॉयफ्रेन्डच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलली 'बालिका वधू' फेम अविका गौर, म्हणाली - तो माझा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 01:34 PM2022-03-03T13:34:52+5:302022-03-03T13:47:06+5:30

Avika Gor : आधीपेक्षा अविका आता चांगलीच स्लिम दिसू लागलीये. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून सगळेच तिच्यावर फिदा आहेत. तूर्तास अविकाचं नाव साऊथ अभिनेता राज थरून सोबत जोडलं जातंय...

‘बालिका वधू’ अविका गौर लवकरच ‘10th Class Diaries’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

10th Class Diaries हा एक तेलगू सिनेमा आहे आणि यात अविका लीड रोलमध्ये आहे. अविका या चित्रपटाची प्रोड्यूसरही आहे. येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सोशल मीडियावर अविका या चित्रपटाचं धडाक्यात प्रमोशन करतेय. रोज नवे ग्लॅमरस फोटो आणि सोबत सिनेमाचं प्रमोशन असं तिचं सुरु आहे.

आधीपेक्षा अविका आता चांगलीच स्लिम दिसू लागलीये. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून सगळेच तिच्यावर फिदा आहेत.

तूर्तास अविकाचं नाव साऊथ अभिनेता राज थरून सोबत जोडलं जातेय. अविकाने राजसोबत दोन सिनेमात काम केलंय आणि साहजिकच तिच्या व त्याच्या नावाची चर्चा आहे.

एका ताज्या मुलाखतीत अविकाला याबद्दल छेडलं असता, तिला हसू आवरलं नाही. राज माझा फक्त चांगला मित्र आहे. मी हैदराबादेत जाते तेव्हा त्याला नक्की भेटते, असं ती म्हणाली.

राज व माझ्या अफेअरच्या अफवा माझ्याही कानावर आल्या. खरं सांगू तर अशा अफवा ऐकून मज्जा येते. माझं नावही चर्चेत येतं, असं ती हसत हसत म्हणाली.

अविका सध्या नागा चैतन्य स्टारर ‘थँक यू’ या सिनेमाचं शूटींग करतेय. यात अविका सपोर्टिंग रोलमध्ये दिसणार आहे.

‘बालिका वधु’ मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती ससुराल सिमर का, झलक दिखलाजा, फियर फॅक्टर- खतरों के खिलाड़ी या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, फॅट टू फिट चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले होते.

काही वर्षांपूर्वी अविका गौर आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंघन यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. अगदी अविका मनिष रायसिंघनच्या मुलाची आई होणार, अशी अफवाही पसरली होती.

अविकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिला तिच्या स्वप्नातल्या राजकुमार मिळाल्याची कबुली दिली होती. सध्या अविका टीव्ही शो ‘रोडिज’ फेम मिलिंद चंदवानीला डेट करतेय.